*तू जग तुला हव तसं ...*
तू हसलास तर ते जळतील,
तू रडलास तर ते हसतील,
काही नवं केलंस तर पाप म्हणतील,
जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतील,
गमावलं तर दरिद्री म्हणतील,
कमावलं तर माज म्हणतील,
पुढे निघालास तर मागे ओढतील,
मागे राहिलास तर तुडवतील,
तू हात दिला तर साथ म्हणतील,
तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील,
कौतुक केलं तर वाह म्हणतील,
उणीव दाखवली तर जा..म्हणतील,
काही केलं तर... *काय केलं??* म्हणतील,
नाही केलं तरी... *काय केलं??* म्हणतील,
म्हणूनच...
*तू जग तुला हव तसं ...*
जगाचं काय???
ते काहीही म्हणतील... ....
Really good
ReplyDelete