Skip to main content

प्रदोष व्रत

🌹 *प्रदोष व्रत* 🌹

वर्षातील प्रत्येक महिन्याला येणाऱ्या प्रदोषाला न खाता पिता पण पाणी पिऊन उपवास करणे. श्रावण महिन्यातील प्रदोषापासून या उपवासाला सुरुवात करतात. एकदा हे व्रत स्वीकारले तर मध्येच सोडून देता येत नाही. वयोमानानुसार कडक उपवास करता येत नसेल तर फळे, दुध घ्यावे पण तिखट मिठाचे, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. संध्याकाळी शिवपूजन करून दहीभाताचा नैवेद्य दाखवावा. तो नैवेद्य गायीला द्यावा आणि दही भात, तक भात खून उपवास सोडावा. हे व्रत बाराही महिन्याचे असल्याने आचरणाचे नियम फक्त उपवासाचे दिवशी पाळावे. कांदा, लसूण खाणाऱ्या लोकांनी चातुर्मास, प्रदोष या दिवशी कांदा, लसूण खाऊ नये. याखेरीज ज्यांना उपवास करायचे नाहीत पण शिवोपासना करायचीय त्यांनी जेवण्यापूर्वी रोज शिवमहिम्न म्हणावे. ज्यांना संस्कृत अवघड वाटते त्यांनी शिवलीलामृताचा रोज एक अध्याय वाचावा. स्त्रियांनी नमःशिवाय हा जप करावा. ओम नमःशिवाय असा जप करावा. जप करणाऱ्यांना सुद्धा व्रत केल्याची फळे मिळतात. पण त्यासाठी मन एकाग्र व्हायला हवे. आपण आई भगवंत एकटेच आहोत असा विचार हवा. दुसरे प्रपंचातील कोणतेही विचार नकोत. यासाठी शरीर शुद्धी आवश्यक आहे. शरीरशुद्धीसाठी उपवास केला नाही तरी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे. पण हा जो नियम कराल तो पूर्ण झाल्याखेरीज पाणीही प्यायचे नाही. हे ठरवून टाका. घरामध्ये अधूनमधून शिवपूजन व्हावे म्हणून एकादशीनी किंवा लघुरुद्र करावा. ते शक्य झाले नाही तर एक रुद्राचे आवर्तन करून अभिषेक करावा. शिव ही आद्यदेवता आहे. पांडुरंग, बालाजी, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई इ. देवता ही शिवाचीच रूपे आहेत. या प्रत्येक देवतेच्या डोक्यावर शिवलिंग आहे. मूळरूप एकच आहे.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Comments